gadgondhali1

.

मी या गडकिल्ल्यांच्या पसाऱ्यात राहणारा, किल्ल्यांवर अमाप प्रेम करणारा एक भटका. किल्ल्यांवरील भटकंतीची हि ओढ कशी निर्माण झाली माहित नाही, पण जेव्हा पासून हि ओढ लागली तेव्हापासून किल्ले हे माझ्या जीवनातील एक घटकच बनले. किल्ल्यांवरील भटकंती हि आधी जवळच्या मंडळी कडून माहिती मिळवून, त्यानंतर पुस्तके वाचून करू लागलो. हळू हळू या क्षेत्रात आल्यावर या बद्दल अधिक माहिती मिळू लागली. त्यात एकदा गो. नि. दांडेकरांचे दुर्गभ्रमणगाथा हे पुस्तक हाती लागले, हा माझ्या भटकंतीचा सुरवातीचा काळ या पुस्तकाने मनात किल्ल्यांविषयी इतकी उर्मी निर्माण केली कि किल्ले भटकण्याचे, त्यांना जाणून घेण्याचे एक वेडच मनात निर्माण झाले. फक्त भटकंती न करता माझे अनुभव, विचार इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी या आधुनिक काळातला ब्लॉग हे उत्तम साधन वाटले म्हणून इथे व्यक्त होतोय…

.